By  
on  

अवधूत-आदर्श ‘वक्रतुंड महाकाय' म्हणत करतायत गणरायाचं स्वागत

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ...."गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत अनोख्या पध्दतीने केलं आहे. सागरिका म्युझिकने 'वक्रतुंड महाकाय' या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हिडिओच दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे. मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेना आणि घाडगे आणि सून मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी उत्तम सादरीकरण यात केलं आहे.

https://youtu.be/wlMpD8NHq1Q

सागरिका म्युझिकच्या ऑफिशिअल युट्युब चॅनेलवर आपल्याला हा व्हिडीओ पाहता येईल. लगबग चालली, सारखं गोड अविट चालीचं सुपरहिट गीत देणाऱ्या सुहित अभ्यंकरने हे नवीन गणेशोत्सवाच खास गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा, तुतारी या वाद्यांसोबत गिटार चा सुंदर मिलाफ या गाण्यात आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेसे शब्द रचले आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive