दहीहंडी म्हटलं की अनेक सेलिब्रिटींना या उत्सवाला फक्त उपस्थित राहण्याकरिता भरघोस मानधन मिळतं. परंतु नुकतंच या दहिहंडी उत्सवानिमित्त उपस्थित राहून एका सेलिब्रिटीचा रंगाचा बेरंग झाला. अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला एका वाईट अनुभवाला दहीहंडी उत्सवानिमित्त सामोरं जावं लागलं. दहीहंडी कार्यक्रमासाठी उत्साहाने हजेरी लावायला आलेल्या नेहासोबत प्रचंड गर्दीत धक्काबुक्की आणि गैरवर्तुणूक झाली. या घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला असून नेहाला या प्रसंगामुळे प्रचंड मनस्तापा घडला. ती खुप नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
नेहा बुलढाण्यातील चिखली येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्च्याच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी पोहचली होती. भाजपा नेत्या श्वेता महाले यांनीच तिला याप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी खास आमंत्रित केलं होतं. पण आता या उत्सवात सहभागी होणं नेहाला प्रचंड भारी पडल्याचं दिसून येत आहे.
[video width="198" height="360" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/09/WhatsApp-Video-2018-09-06-at-6.15.07-PM-11.mp4"][/video]
दहीहंडीउत्सवाच्या या कार्यक्रमात स्टेजवर नेहाने चाहत्यांसोबत आपला संवाद संपविल्यानंतर, हजारो लोकांनी तिला घेरलं आणि जबरदस्तीने तिच्यासोबत फोटो काढण्यास सुरुवात केली. ती नको म्हणत असतानासुध्दा लोकांचं सेल्फी काढणं सुरुच होतं, काहींनी तर गैरवर्तवणुकीचासुध्दा प्रयत्न यावेळेस केला. जवळपास अर्धा तास हा सारा गोंधळाचा प्रकार सुरु होता. नेहाच्या मते, तिने आयोजकांना याबाबत तक्रारसुध्दा केली परंतु कोणीच तिचं ऐकलं नाही व तिच्या मदतीला आलं नाही.
[video width="408" height="720" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/09/WhatsApp-Video-2018-09-06-at-6.15.07-PM-2.mp4"][/video]
या दहीहंडीच्या संपूर्ण प्रकाराबाबत नेहा म्हणाली, “मी खुप उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाली होती. परंतु काहीच वेळात सारा प्रकार माझ्या लक्षात आला. एका मुलीसोबत कशाप्रकारची वागणूक केली जाते, हे समजलं. जणू काही त्यांच्या घरी मुली नाहीतच. हे इतकं अचानक घडत होत, काय करावं तेच मला समजत नव्हतं. मी सुन्न झाले होते.”
आयोजकांनी आणि श्वेता महाले यांनी नेहाची या घडल्या प्रकारानंतर समजूत काढण्याचा खुप प्रयत्न केला, परंतु तिने कोणाचंच न ऐकता मार्ग काढत तडक आपली गाडी गाठली व मुंबईकडे रवाना झाली.