By  
on  

बिग बींसमोर मि. परफेक्शनिस्टची उडाली धांदळ

बॉलिवूडमधील अभिनयाचे दोन वाघ प्रथमच एकत्र झळकणार आहेत. शहनशाह अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर खान या दोघांना एका आगामी सिनेमात एकत्र पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. ठग्स ऑफ हिंदुस्थान या सिनेमात अमिताभ यांच्यासोबत आमीर खान स्क्रिन शेअर करणार आहे. अमिताभ आपल्या सिनेकारकिर्दीत अनेक जुन्या आणि नवोदित कलाकारांसोबत काम करतात. पण अमितजींसोबत काम करताना आपल्याला किती आणि कसं दडपण आलं हे खुद्द मि. परफेक्शनिस्ट सांगतोय.

एका मुलाखतीदरम्यान आमिर खान हा अमिताभ यांच्यासोबत ठग्स ऑफ हिंदुस्थान सिनेमात झळकण्याबाबत म्हणाला, “सर्वांसारखाच मीसुध्दा अमिताभ बच्चन यांचा खुप मोठा चाहता आहे. आम्ही जेव्हा रिहर्सलसाठी पहिल्यांदा भेटलो, तो क्षण माझ्यासाठी एका चाहत्याला मिळणा-या आनंदाच्या पर्वणीएवढाच मोठा होता. सिनेमाचे सीन वाचायला आम्ही एकत्रच बसलो होतो. पण त्यांना समोर पाहून मी धड बोलूसुध्दा शकत नव्हतं. माझी जिभच सारखी अडखळत होती आणि अक्षरश: धांदळच उडाली व मी गोंधळून गेलो.”

ठग्स ऑफ हिंदुस्थान हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमात बिग बी आणि आमिरसोबतच कतरिना कैफसुध्दा झळकणार आहे. हा सिनेमा येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive