बॉलिवूडमध्ये कधी कोण कोणाबद्दल काय बोलेल याचा काही नेम नाही. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी छान मित्र आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. तसेच राणी व सलमानचीसुध्दा छान गट्टी जमते. राणी- शाहरुख दोघंही नुकतेच सलमानचा सोनी वाहिनीवरील कार्यक्रम दस का दममध्ये पोहचले आणि दोघांनीही सलमानची जबरदस्त टर उडवली. फक्त इतकंच नाही राणीने तर चक्क सलमान आणि शाहरुखला भविष्यात यजमान होण्याचा सल्ला दिला, हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.
https://www.instagram.com/p/BnVjVwOgBGm/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
शाहरुख खान म्हणाला माझा मुलागा अब्राम जो पाच वर्षांचा आहे तो अगदी सलमानसारखाच वागतो. तो सारखा आय लव्ह यू म्हणतो. आय लव्ह यू पापा, आय लव्ह यू मम्मा याच्यानंतर सर्व मुलींना तो म्हणतो, आय लव्ह यू, आय लव्ह यू टू अगदी सलमान टाईपच आहे तो. तर राणी म्हणते सलमानला मुलगी व्हावी अशी मी प्रार्थना करते. कारण यामुळे या दोघाचं भविष्यात नातं जुळू शकतं. सलमानची मुलगी आणि शाहरुखचा मुलगा. मग काय, या धम्माल संवादावर प्रेक्षकसुध्दा खळखळून हसू लागले. तर शाहरुख म्हणतो ही इथून मेहंदी लावूनच जाणार ही राणी मुखर्जी नाही ही तर शादी मुखर्जी आहे.
सलमान, शाहरुख आणि राणी मुखर्जी यांच्या मस्तीचा हा दस का दम प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करणार यात शंका नाही.