By  
on  

आता ‘काळे धंदे’ करणा-यांचं खरं नाही, महेश मांजरेकर करणार पर्दाफाश

सध्या वेबसिरीजच्या माध्यमातून मनोरंजनाचा उत्तम प्लॅटफॉर्म रसिकांसमोर आला आहे. आता आणखी एक वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘काळे धंदे’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. या वेबसिरीजच्या पोस्टरमध्ये महेश मांजरेकर यांच्या हातात दोन बंदुका आहेत. त्या एका फरच्या हार्टमागे लपलेल्या शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडेवर रोखली असल्याचं दिसून येत आहे.

 

आता या दोघांनी कोणते काळे धंदे केले आहेत आणि महेश मांजरेकर त्यांचा कसा पर्दाफाश करणार हे पाहायला प्रेक्षकांना मज्जा येणार हे नक्की ! या पोस्टरला कॅप्शनही भन्नाट आहे. ‘होणार भल्याभल्यांचे वांदे, जेव्हा उघड होणार लपवलेले ‘काळे धंदे’! नवीकोरी करकरित सिरीज, बरोब्बर एका महिन्यांत...’ झी 5ची ही वेबसिरीज 24 सप्टेंबरला झी 5वर रिलीज होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive