अभिनेता संजय दत्तने त्याच्या प्रॉड्क्शन हाऊस मार्फत ‘बाबा’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली. 2 ऑगस्ट 2019ला रिलीज झालेल्या या सिनेमाने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. आता हा सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला आहे. हा सिनेमा 24 ऑगस्टला दक्षिण कोरियामध्ये रिलीज झाला आहे. बाबा हे आई वडिल आणि त्याचा मुलगा यांच्यामधील हळव्या नात्याची गोष्ट आहे.
यामध्ये मुकबधिर असलेल्या या दांपत्याला आपल्या मुलाच्या कस्टडीसाठी झगडावं लागतं. या सिनेमात दीपक डोब्रियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर आणि स्पृहा जोशी यांच्या भूमिका आहेत. या सिनेमासोबतच संजय दत्त ‘प्रस्थानम’ नावाचा सिनेमाचीही निर्मिती करत आहे. याशिवाय तो पानीपत', 'सड़क 2', 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' आणि 'KGF: चॅप्टर 2' या सिनेमांमध्येही दिसणार आहे.