By  
on  

Bday Spl :आशा भोसलेंबद्दल या टॉप 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

बॉलिवूड गाजवणा-या संगीत सम्राज्ञी आणि प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस. आशाताईं आज आपला 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. लावणी असो किंवा भक्तीगीत, शास्त्रीय संगीत असो किंवा पाश्चिमात्य पठडीतील गाणी सर्वत्रच आपल्या सुरांची सुरेल बरसात करणं यात आशाताईंचा हातखंडा. चला तर मग, वाढदिवसानिमित्त आशाताईंबद्दलच्या टॉप 10 खास गोष्टी पिपींगमूनमराठीवर जाणून घेऊयात.

1.आशा भोसले यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत 8 सप्टेंबर रोजी झाला. प्रसिध्द संगीतकार दिनानाथ मंगेशकर यांची आशा ही कन्या. तसेच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांची ही धाकटी बहिण.

2. आशा भोसले यांच्या नावावर सर्वाधिका गाणी गाण्याचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची पण नोंद आहे. आशाताईंनी 1943 पासून आतापर्यंत जवळपास 12000 गाणी गायली आहेत. यात सोलो, ड्युएटस आणि पार्श्वगायनाचा समावेश आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 20 पेक्षा अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्येसुध्दा गाणी स्वरबध्द केली आहेत.

3. दहा वर्षांच्या आसल्यापासूनच आशाताईंनी गायनाला सुरुवात केली. त्या आपली बहिण लता मंगेशकर यांच्यासोबत गाण्याचा रियाझ करत असत.

4. आशाताईंनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी घरच्यांचा विरोध पत्करुन 31 वर्षीय गणपतराव भोसले यांच्यासोबत विवाह रचला. पण नंतर काही कालावधीनंतर त्यांनी पती आणि सासर सोडून दोन मुलांसह माहेर गाठलं आणि पुन्हा गायन कारकिर्दीची सुरुवात केली.

5. अनेक वर्षांनी आशाताईंनी प्रसिध्द संगीतकार आर.डी बर्मन यांच्यासोबत दुसरी लग्नगाठ बांधली. आर.डी बर्मन हे आशाताईंपेक्षा सात वर्षांनी लहान होते.

6. बी.आर चोप्रा यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नया दौर' सिनेमातील आशाताईंच्या गाण्यांनी उच्चांक गाठला.'मांग के साथ तुम्हारा' 'उड़ें जब जब जुल्फें' आणि 'साथी हाथ बढ़ाना' ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

7. प्रसिध्द अभिनेत्री हेलन यांच्यासाठी आशाताईंनी जास्त पार्श्वगायन केलं आहे. 'पिया तू अब तो आज (कारवाँ) आणि ‘ये मेरा दिल’ (डॉन) या गाण्यांनी सर्वांना ठेका धरायला लावलं.

8. 'पॉप क्रूनर ' आणि 'कॅबरे सिंगर'चा किताब बहाल करण्यात आलेल्या आशाताईंनी जेव्हा उमराव जान सिनेमासाठी 'इन आँखों की मस्ती के', 'दिल चीज क्या है' ही गाणी गाऊन आपण वर्सटाईल सिंगर असल्याचं सिध्द केलं.

9. आशाताईंना 1997 मध्ये त्यांच्या अल्बमसाठी मानाच्या अशा ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं. ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळवणा-या त्या पहिल्या भारतीय सिंगर ठरल्या.

10. भारत सरकारतर्फे 2000 साली आशाताईंना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात लं तर 2008 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला. आशाताईंचा 7 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive