By  
on  

Bday Spl :आशाताईंच्या या टॉप 5 गाण्यांवर तुम्ही नक्कीच ठेका धराल !

आपल्या जादूई स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणा-या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. आशाताईंनी बॉलिवूडमध्ये आपला स्वरसाज चढवत अनेक सुपरहिट गाणी दिली. अनेक नायिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. त्या गाण्यांवर आपण आजही थिरकतो. आपल्या चिरतरुण गाण्यांसारखंच आशाताईंचं व्यक्तिमत्त्वसुध्दा तितकंच चिरतरुण आहे. वाढदिवसानिमित्त आशाताईंची प्रसिधद् टॉप 5 गाणी खास पिपींगमूनवर ज्यावर तुम्ही ताल न धरला तरच नवल!

दिलवाले दुल्हनियॉं लें जाएेंगें : जरा सा झूम लू में 

https://youtu.be/kjUTs76Gnks

 

नमक हलाल : जवानी जानेमन हसीन दिलरुबा 

 

https://www.youtube.com/watch?v=f5bEkgKTZmw

 

 

कॉरवॉं : पियॉं तू अब तो आजा 

https://youtu.be/9xSgeseG2SE

 

हरे राम हरे कृष्णा : दम मारो दम 

https://youtu.be/3muMjMT6hSA

आर.डी. बर्मन यांच्यासह हिंदी सिनेसृष्टीत ‘कॅब्रे डान्स’च्या गाण्यांचा पाय थिरकवणारा बाजही आशाताईंनी जबरदस्त गाण्यातून खुलवला. तर  ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘साथी हाथ बढाना’, ‘कतरा कतरा’ अशी त्यांची कितीतरी यादी न संपणारी गाणी रसिकांना भुरळ घालतात.

आपल्या हरहुन्नरी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाने प्रत्येकाला आपलंसं करुन घेण्याची जादू आशाताईंकडे आहे. पिंपींगमून मराठीतर्फे आशाताईंना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा आणि त्यांच्या सांगितीक कारकिर्दीस मानाचा मुजरा !

Author

Recommended

PeepingMoon Exclusive