By  
on  

'लैला मजनू'वर सर्वत्र होतोय कौतुकांचा वर्षाव

इतिहासात आपली प्रेमकथा अजरामर करणा-या ‘लैला मजनू’ची अनोखी आणि आजच्या काळातील खरी कहाणी रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा साकारण्यात आली. प्रतिभावन दिग्दर्शक इम्तियाज अलीनने ही ऐतिहासिक ‘लैला मजनू’ची प्रेमकहाणी एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणली. इम्तियाजने या सिनेमासाठी एकता कपूरसोबत हातमिळविणी केली. एकता कपूरच्या ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

नवोदित कलाकार तृप्ती दिमरी व अविनाश तिवारी हे दोघं आधुनिक ‘लैला मजनू बनून’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरल्याची पोचपावती आता मिळू लागली आहे. आपला नवखेपणा त्यांनी अभिनयातून अजिबातच जाणवू दिला नाही. अप्रतिम लोकेशन्सवर चित्रत झालेल्या ‘लैला मजनू’वर आता सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यपने केलं कौतुक 

अनुराग ट्विटरवर म्हणतो, ‘लैला मजनू’ ही एक हदयस्पर्शी प्रेमकथा आहे. अविनाश तिवारीने रंगवलेला आजच्या काळातला मजनू अप्रतिम आहे. त्याच्यामुळे एका चांगल्या अभिनेत्याचा इंडस्ट्रीत प्रवेश झाला असं म्हणावं लागेल. सिनेमाचं संगीत तर जबरदस्त आहे.

https://twitter.com/anuragkashyap72/status/1036122018930978816

सोशल मिडीयावर तर ‘लैला मजनू’  सिनेमावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

https://twitter.com/hoodajmdlr/status/1038258872769765376

 

https://twitter.com/TusshKapoor/status/1038119263234674691

 

 

https://twitter.com/dkbairwaworld/status/1038252003346984960

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive