By  
on  

Exclusiveव्हिडीओ: सैनिक सिनेमाच्या आठवणींना उजाळा देतेय अश्विनी भावे

बॉलिवूडमध्ये 1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘सैनिक’ हा सुपरहिट सिनेमा मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आपल्या सदाबहार अभिनयाने सजवला.10 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आज 25 वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने या सिनेमाच्या चित्रिकरणा दरम्यानच्या सुंदर आठवणींना अश्विनी यांनी एक व्हिडीओ शेअर करत उजाळा दिला आहे.

https://twitter.com/i/status/1038997028699811841

अश्विनी भावे म्हणतात, “माझा विश्वासच बसत नाही, आज सैनिक सिनेमाने 25 वर्ष पूर्ण केली आहेत. शूटींगचे ते दिवस डोळ्यासमोर अजूनही तसेच तरळतायत. 28 दिवसांत आम्ही सलग शूटींग करुन सिनेमा पूर्ण केला होता. सिनेमातील अलका या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांची उत्कृष्ट अशी दाद मिळाली. 25 वर्ष उलटूनही चाहते आजही आवर्जून ‘सैनिक’साठी माझं कौतुक करतात, तेव्हा आपल्या कामाचं फळ मिळाल्याचं समाधान मिळतं.”

अश्विनी पुढे सांगतात, "सैनिक सिनेमाची आमची संपूर्ण टीम एखाद्या कुटुंबाप्रमाणेच होती. धम्माल-मस्ती करत आम्ही शूटींग करायचो.अक्षय कुमारबद्दल काय सांगणार तो पूर्ण सेटवर मजा आणायचा. आजही त्या आठवणींनी नकळत हसू येतं."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive