By  
on  

भूषण प्रधानच्या नवीन सिनेमाचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील हॅंण्डसम अभिनेता अशी ओळख असलेला भूषण प्रधान लवकरच आपला नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तू तिथे असावे’या नवीन सिनेमाचे पोस्टर सोशल मिडीयावर लॉन्च करत भूषणने आपल्या आगामी सिनेमाची माहिती दिली आहे.

संतोष गायकवाड दिग्दर्शित ‘तू तिथे असावे’या सिनेमात भूषण प्रधान आणि पल्लवी पाटील ही जोडी झळकणार आहे. या निमित्ताने एक नवीन आणि हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या या फर्स्ट लूकवरुनच हा एक रोमॅण्टीक सिनेमा असल्याचा अंदाज येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका संघर्ष करणा-या गायकाची कथा सिनेमात रेखाटण्यात आली आहे. पण सिनेमाच्या कथेबाबत भूषणने कोणताच उलगडा अद्याप आपल्या सोशल मिडीया अकाऊंटद्वारे केलेला नाही.

https://www.instagram.com/p/BndSIM2Fep1/

संतोष गायकवाड दिग्दर्शन करत असलेल्या ‘तू तिथे असावे’ सिनेमाची प्रस्तुती जी कुमार पाटील एन्टरटेन्मेन्टची असून निर्मितीची धुरा गणेश पाटील यांनी सांभाळली आहे.

भूषण प्रधान आणि पल्लवी पाटील या जोडीसोबतच मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील आदी कलाकारांच्यासुध्दा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘तू तिथे असावे’सिनेमाच्या प्रदर्शनाची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive