कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला पहिल्या भूमिकेबद्दल कायमच ओढ असते. करीअर मधील भूमिका ती परिपूर्ण व्हावी यासाठी केलेला अट्टाहास आणि त्यातून शिकायला मिळालेली प्रत्येक गोष्ट पुढील आयुष्यात कामाला येते. अभिनेता सुबोध भावेनेही त्याच्या पहिल्या मालिकेबाबतची आठवण शेअर केली आहे. सुबोधने अल्फा मराठी (आताचं झी मराठी) या मालिकेत पहिले बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारली होती.
या मालिकेतील फोटो सुबोधने नुकताच शेअर केला आहे. या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘माझी पहिली मालिका @zeemarathiofficial वरील, तेव्हाच #अल्फामाराठी स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित "पेशवाई" आणि भूमिका होती पहिल्या बाजीराव पेशव्यांची. इतिहासातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व.’ सुबोधने शेअर केलेल्या फोटोवर श्रुती मराठेने कमेंट करत ती देखील या मालिकेत होती असं सांगितलं.
श्रुतीने तिची या मालिकेशी निगडीत आठवण शेअर करण्यासाठी एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत ती खुप गोड दिसत आहे. ती कॅप्शनमध्ये म्हणते, ‘ Majhi pahili malika ! PESHWAI ! 10th madhe hote me.’ या दोन्ही कलाकारांमुळे रसिकांच्याही या मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या असतील यात शंका नाही.