बॉलिवूड ‘चांदनी’श्रीदेवी यांचं सिनेसृष्टीतील योगदान अमूल्य आहे. श्रीदेवी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सिनेमांचा किंवा अभिनयाचा विसर आपल्याला कधीच पडू शकत नाही. दर्जेदार सिनेमे देऊन प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणा-या या सुपरस्टार अभिनेत्रीच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात येणार आहे.
मिडीया रिपोर्ट्सनुसार स्विर्झलॅंड ऑथोरिटीने अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रसिध्द बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता दिवंगत यश चोप्रा यांना हा सन्मान मिळाला होता. स्विर्झलॅंडच्या इंटरलेकन सिटीमध्ये यशजींचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या सर्वच सिनेमांचे शूटींग येथे पार पडले हे या मागचे खास कारण. यशजीनंतर आता श्रीदेवींना हा मान मिळतो आहे. श्रीदेवींचा 1989 साली प्रदर्शित झालेल्या चांदनी या सिनेमातील बहुतेक गाण्यांचे शूटींग येथेच पार पडले.
स्विर्झलॅंड हे भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण असून ते नेहमीच येथे मोठ्या संख्येने भेट देतात. सुपरहिट ‘दिलवाले दुल्हनियॉं लें जाएगें’सिनेमातील चर्चमधील शाहरुख काजोलला प्रपोज करतो तो सीन स्विर्झलॅंड येथीलच आहे. यशजींच्या अनेक सिनेमांचे आणि गाण्यांचे शूटींग स्विर्झलॅंडच्या बर्फाच्छादित आणि नयनरम्य पवर्तरांमध्ये झाले आहे व प्रेक्षकांनीसुध्दा त्याला भरभरुन दाद दिली आहे. स्विर्झलॅंड संपूर्ण जगभरातील पर्यटकांकडून पसंतीची पावती मिळते.
अभिनेत्री श्रीदेवींच्या पुतळा हा स्विर्झलॅंडमध्ये येणा-या पर्यटकांसाठी आणि भारतीयांसाठी खास आकर्षण ठरणार एवढं मात्र नक्की!