By  
on  

पाहा अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे नवीन फोटोशूट

अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करताना पाहायला मिळते. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. राझी सिनेमातील अमृताच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अभिनयासोबतच अमृताच्या डान्ससुध्दा तितकाच भन्नाट असतो. अमृताच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा खुप चर्चा होते. ती नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देते. अमृताने नुकतंच एक जबरदस्त फोटोशूट केलं असून त्याचे हटके फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

 

गडद निळ्या रंगातल्या या लूकमध्ये अमृताच्या सौंदर्याला चॉंर चॉंद लागतायत. अमृताचे हा मनमोहक फोटो आपल्या लेन्समध्ये कैद केला आहे, फोटोग्राफर अजय पाटील यांनी

 

संपूर्ण निळ्या गडद रंगाचा ड्रेस आणि सोबतीला ही मोठी निळ्या नेटची फ्रीलसोबत अमृताचा हा हटके अॅटीट्यूड भाव खाऊन जातो.

 

डिझाईनर निकीता टंडन यांनी डिझाईन केलेल्या या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अमृताचं सौंदर्य आपल्या स्टाईलने नेहा चौधरी यांनी खुलवलं आहे.

नेहमी विविध व्यक्तिरेखा साकारायला आवडणा-या अमृताला प्रत्येकवेळी पहिल्यापेक्षा वेगळ्या भूमिका करण्यावर भर देते. तिला फक्त ग्लॅमरस अभिनेत्री व्हायचं नाही, तर प्रेक्षकांना सतत नवीन काहीतरी देत राहायला आवडतं.

मराठी पिपींमगमूनतर्फे अभिनेत्री अमृता खानविलकरला आगामी प्रोजेक्ट्साठी खुप खुप शुभेच्छा!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive