By  
on  

ओळखा पाहू सोनाली कुलकर्णी कोणाची भूमिका साकारतेय ?

चतुरस्त्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच आपल्या भूमिकांबाबत चोखंदळ असते हे आपण जाणतोच.मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येसुध्दा सोनालीच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली आहे. सोनाली एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्येक भूमिका जीवंत करणा-या या गुणी अभिनेत्रीला आता कोणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती, पण अखेर याचा उलगडा झाला आहे.

सुलोचना दिदी हे मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व. आजपर्यंत 200 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये चरित्र व्यक्तिरेखा साकारणा-या महाराष्ट्राच्या लाडक्या सुलोचना दीदींची भूमिका साकारण्याचं आव्हानं सोनाली कुलकर्णीने पेललं आहे. आगामी ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात सोनाली दीदींच्या भूमिकेत दिसणार आहे. सुलोचना दीदींची ही भूमिका साकारण्याविषयी सोनालीने आपलं व्यक्त करताना म्हटलंय, आपलं आयुष्य सफल वाटण्यासाठी काही गोष्टी असतात, त्यापैकीच माझ्या आयुष्यातली सुलोचना दिदींची ही भूमिका.

https://twitter.com/sonalikulkarni/status/1039161598248660992

रंगभूमी गाजवणारे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास “…..आणि काशिनाथ घाणेकर” या आगामी सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा सिनेमा यंदा दिवाळीत प्रदर्शित होत आहे. ज्यांच्या नावावर नाटकाला हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते… ज्यांच्या नाटकाने मराठी रसिक प्रेक्षक भारावून जात होते त्या नटवर्य डॉ. घाणेकरांचा जीवनपट

नेहमीप्रमाणेच सोनाली आपल्या सदाबहार अभिनयाने या सुलोचना दीदींच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांची मनं जिंकणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive