‘बधाई हो’ आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा एखादी आनंदाची गोष्ट घडते. बहुतेकदा लग्नासाठी अशा शुभेच्छा देतो किंवा घरी छोट्या पाहूण्याचं आगमन होणार असतं तेव्हा अशा शुभेच्छा दिल्या जातात. आता या नावाचा सिनेमा येतोय म्हटल्यावर पहिल्यांदा आपण नक्कीच असा अंदाज बांधला असणार की एखाद्या लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्याच्या किंवा त्यांच्या लग्नापूर्वीच्या गोड बातमीभोवती ‘बधाई हो’ सिनेमा आधारित असणार.......अहो पण असा गोड गैरसमज तुम्ही अजिबात करुन घेऊ नका......तुम्ही जर यापैकी कोणता विचार करत असाल तर तसं अजिबातच नाहीय... आम्ही सांगतो नक्की या ट्रेलरमध्ये काय दडलंय...आणि हा सिनेमा नेमका कशाभोवती गुंफला आहे.
‘बधाई हो’ या सिनेमात एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी पाहायला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबात एका छोट्या पाहुण्याचं लवकरच आगमन होणार आहे. पण ही आनंदाची बातमी असण्यापेक्षा या कुटुंबासाठी ती जरा शरमेची बाब ठरतेय याचं कारण म्हणजे, यात पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत ते आधीच दोन तरुण मुलांचे असलेले पालक. जेव्हा आपली आई पुन्हा एकदा आई होणार हे या दोन मुलांना, त्यांच्या कुटुंबाला आणि शेजारी-पाजारी कळतं तेव्हा काय गमती-जमती आणि धम्माल घडतं हे तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मजा येईल.
https://twitter.com/ayushmannk/status/1039360419079573504
आयुषमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता आदी कलाकारांच्या धमाकेदार भूमिकांनी सजलेला ‘बधाई हो’ सिनेमा संपूर्ण कुटुबांचं निखळ मनोरंजन करणार एवढं मात्र नक्की! जंगली पिक्चर्स प्रस्तुत ‘बधाई हो’ हा येत्या 19 ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये गोड बातमी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
https://youtu.be/unAljCZMQYw