By  
on  

मीरा म्हणते प्रत्येक आई आपल्या बाळाला देते ही सुंदर भेट

शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत हे दोघे 5 सप्टेंबरला दुस-यांदा आई-बाबा झाले. मीराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि हे चौकोनी कुटुंब परिपूर्ण झालं. या दोघांना मीशा ही दोन वर्षांची पहिली मुलगी आहे. आता मीराला पुन्हा मातृत्वसुख लाभलं आहे.

शाहिद आणि मीराने आपल्या लाडक्या मुलाचं नाव झैन असं ठेवलं आहे. दोघंही आपल्या बाळाचे लाड पुरवण्यासाठी व योग्य ती काळजी घेण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. शाहिदसुध्दा आपल्या सिनेमांच्या व्यस्त शेड्यूलमधून हक्काच्या पालकत्त्व रजेवर आहे व तो मीरासोबत घरी मीशा आणि नवीन बाळाची काळजी घेत आहे.

मीराने आपल्या डिलीव्हरीपूर्वी एका मुलाखती दरम्यान अशा काही गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या प्रत्येक आईसाठी महत्त्वाच्या ठरतात. दोन मुलांची आई असलेली मीरा राजपूत म्हणते, “स्तनपान म्हणजे प्रत्येक आईने आपल्या बाळाला दिलेली एक सुंदर भेट असते. बाळाला नेहमी स्तनपान करावं. मीशालासुध्दा मी ते दिलं होतं आणि आता झेनलासुध्दा देतेय. हे आयुष्यातील अमूल्य व सुंदर क्षण असतात. जे प्रत्येक आईने छान जपायला हवेत. तसंच नवीन मातांनी नेहमी खुश राहायला हवं आणि जेव्हा बाळ झोपेल तेव्हा स्वत:पण झोप घ्यावी म्हणजे जास्त ताण जाणवणार नाही.”

Recommended

PeepingMoon Exclusive