करिना कपूर खान लवकरच एक गुड न्यूज देणार आहे. तुम्ही म्हणाल,आम्हाला माहितीय की ती गुड न्यूज नावाचा सिनेमा करतेय. त्यामुळे यात काहीच नवल नाही. तैमूरच्या जन्मानंतरसुध्दा तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली. मातृत्वासाठी तिने आपल्या सिनेकरिअरमधून कधीच मोठा ब्रेक घेतलेला नाही, हे आपण जाणतोच आहोत.
अहो, पण आता करिनाने चक्क दुस-या बाळासाठी तयारी सुरू केली आहे. करिना आणि सैफप्रमाणेच त्यांच्या लाडक्या तैमूरचाही खुप मोठा फॅन फॉलोवर आहे. तैमूर सध्या दीड वर्षांचा आहे. करिना पुन्हा लवकरच गुड न्यूज देणार म्हटल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आहे. तैमूर लवकरच मोठा भाऊ म्हणून मिरवणार हे नक्की!
एका चॅट शोमध्ये करिना कपूर आणि तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा एकत्र होत्या. तेव्हा या मुलाखतीमध्ये दोघींनी दिलखुलास गप्पा मारल्या. जेव्हा मुलाखतीत करिनाला दुस-या बाळाचा विचार सुरु आहे का असा प्रश्न विचारला गेला तेव्हा करिना म्हणाली, “ हो. पण मला साधारण यासाठी दोन वर्षांचा वेळ हवा आहे. माझ्या डोक्यात पूर्वीपासूनच दोन मुलांचं प्लॅनिंग आहे.” करिनाच्या या उत्तरावर सर्वच अवाक् झाले आणि अमृता खटट्याळपणे महणाली तुझा जर दुस-या बाळाचा विचार असेल तर मला आधी सांग मी हा देशच सोडून जाते.
https://youtu.be/yyS9MnQqEQU
तैमूरच्या जन्मानंतरचा करिनाचा ‘वीरे दी वेडींग’ हा सिनेमा सुपरहिट ठरला, चाहत्यांना तिच्या आगामी सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. ती करण जोहरच्या ‘गुड न्यूज’ या सिनेमामध्ये झळकणार आहे आणि आता तर तिच्या ख-या आयुष्यातसुध्दा ती पुन्हा गुड न्यूज देणार म्हटल्यावर सोने पें सुहागाच.