By  
on  

वरुण-अनुष्काने केलं इकोफ्रेंडली बाप्पाचं स्वागत

सुई धागा मेड इन इंडिया सिनेमातील मौजी आणि ममता म्हणजेच वरुण धवन आणि अनुष्का शर्मा ही जोडी आपल्या सिनेमाचं सध्या जबरदस्त प्रोमोशन करताना दिसून येत आहेत. पण या प्रोमोशनच्या वस्त शेड्यूलमधूनसुध्दा हे दोघं लाडक्या बाप्पाचं छान स्वागत करताना पाहायला मिळाले. एका कार्यक्रमात खास उपस्थिती लावून वरुण आणि अनुष्काने सर्वांना इकोफ्रेंडली गणराय घरी आणण्याचं आवाहन केलं. तसंच या मूर्ती किती पर्यावरणपूरक असून त्याचा किती चांगला परिणाम घडतो, हेसुध्दा पटवून दिलं.

या कार्यक्रमानंतर अनुष्काने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती वरुणसोबत संवाद साधताना दिसून येतेय. सुई धागाच्या टीमने एका खास धाग्यापासून हा गणपती बाप्पा तयार केला आहे आणि तो संपूर्णपणे इकोफ्रेंडली आहे असं त्यांनी यात सांगितलं.

गणेशचतुर्थीनिमित्त सुई-धागाच्या टीमने तयार केलेला इकोफ्रेंडली बाप्पा

https://www.instagram.com/p/BnpzXrGAQyT/?taken-by=anushkasharma

सुई धागा ही एका सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची यशोगाथा आहे. या सिनेमानिमित्ताने वरुण धवन आणि अनुष्का शर्मा प्रथमच एकत्र झळकत आहेत. सुई धागा मेड इन इंडिया हा सिनेमा येत्या 28 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive