By  
on  

लता मंगेशकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काढले हे उद्गार

भारतरत्न लता मंगेशकर काही दिवसांपुर्वीच गायिका रानू मंडल यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. लतादीदींनी सावरकर आणि त्यांच्या वडिलांमधील संबंधाला उजाळा दिला आहे. लतादीदी म्हणतात,

 

'वीर सावकर यांचे मंगेशकर परिवाराशी घनिष्ठ संबंध होते. म्हणूनच त्यांनी माझ्या वडिलांच्या नाटक कंपनीसाठी 'सन्यस्त खडग' हे नाटक लिहिले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग १८ सप्टेंबर १९३१ रोजी झाला होता. या नाटकातील एक गीत फार लोकप्रिय झाले'. असं लतादीदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. यासोबत ‘शतजन्म शोधिताना’ या गाण्याची लिंकही त्यांनी शेअर केली आहे. आज सोशल मिडियावर सावरकरांबाबत अनेकदा सोशल मिडियावर द्वेष पसरवला जात आहे. यावर लतादीदींनी अनेकदा नेटिझन्सनाही सुनावलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive