शिवरायांच्या या सिंहाला ओळखलं का? अजय पुरकर साकारत आहेत ही व्यक्तिरेखा

By  
on  

शिवरायांच्या गनिमी कावा या युद्धनितीने भल्याभल्यांची झोप उडवली. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा घेऊन दिग्पाल लांजेकर रसिकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाच्या टीजरने रसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. या सिनेमातील एक-एक पात्रांचा परिचय होऊ लागला आहे. अलीकडेच अभिनेते हरिष दुधाडे या सिनेमात बहिर्जी नाईकांची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे.

 

आता अभिनेते अजय पूरकर यांनी एक फोटो शेअर केला आहे. यात ते तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. ‘सवराज्याच्या वाघाला नीट बघून घे... या वाघाचं नाव... सुभेदार तानाजी मालुसरे’ असं कॅप्शन अजय यांनी या पोस्टला दिलं आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

Recommended

Loading...
Share