2009 साली 'नटरंग' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाची भुरळ मराठीसह हिंदी प्रेक्षकांनाही पडली. खुद्द अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचं कौतुक केलं. ही तर फक्त सुरुवात होती त्या दिग्दर्शकाची. काही माणसं यशामध्ये हरवुन जातात. परंतु या दिग्दर्शकाने 'नटरंग'च्या यशाची गोडी चाखत आजपर्यंत स्वतःच्या उत्तमोत्तम सिनेमांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. तो दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव.
जाहीरात क्षेत्रात स्वतःचा जम बसवत असलेल्या रवी जाधव यांच्या डोक्यात सिनेमाचं वेड होतं. 'नटरंग' या पहिल्याच सिनेमातुन त्यांनी हे वेड सर्वांना दाखवुन दिलं.
'नटरंग' नंतर रवी कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अभिनेता सुबोध भावे आणि नितीन देसाई यांच्या साथीने रवी जाधव यांनी 'बालगंधर्व' सिनेमाचं शिवधनुष्य पेललं. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना रंगभुमीच्या सुवर्णकाळाची जाणीव करुन दिली.
त्यानंतर पुढे 'बालक पालक', 'टाईमपास', 'टाईमपास 2' सारखे उत्तमोत्तम सिनेमे बनवुन रवी जाधव यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
रवी जाधव यांनी आपल्या दिग्दर्शनातुन सतत नवनवीन प्रयोग केले. त्यांनी 'मित्रा' सारखा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बनवला.
रवी जाधव हे स्वतः जे.जे. स्कुल ऑफ आर्टस् चे विद्यार्थी. 'न्युड माॅडेल' सारखा संवेदनशील विषय त्यांनी 'न्युड' या सिनेमातुन प्रेक्षकांसमोर आणला. या सिनेमाचं आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शकीय कलात्मकतेचं सर्व स्तरांकडुन कौतुक झालं.
2017 साली आलेल्या प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबु' या सिनेमातुन रवी जाधव यांच्यामधील अभिनयाचं सुद्धा प्रेक्षकांना दर्शन घडलं.
आपल्या सिनेमांमधुन प्रेक्षकांच्या चित्रजाणीवा समृद्ध करणा-या अशा या कलात्मक दिग्दर्शकास पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा