लता दीदींच्या भगिनी मीना मंगेशकर यांचे 'मोठी तिची सावली' आत्मवृत्त आता हिंदीत

By  
on  

लता मंगेशकर हे भारतीय संगीतक्षेत्रातील दिग्गज नाव. लता मंगेशकर यांच्या सुरेल गायनाने अनेक पिढ्या श्रवणीय झाल्या आहेत. लतादीदींच्या आयुष्यावर आणि त्यांच्या संगीत कारकीर्दीवर आजवर असंख्य पुस्तकं वाचकांच्या भेटीस आली आहेत. यातील एक खास पुस्तक म्हणजे लता दीदींची बहीण मीना मंगेशकर लिखीत 'मोठी तिची सावली' हे आत्मवृत्त.

मीना मंगेशकर हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. मीनाजींनी 'माणसाला पंख असतात', 'शाबास सुनबाई', 'रथ जगन्नाथाचा', 'कानुन का शिकार' अशा काही मोजक्या मराठी तसेच हिंदी सिनेमांना संगीत दिलं आहे. मीनाताईंच्या संगीत परिसस्पर्शाने सजलेली 'सांग सांग भोलानाथ' आणि 'चाॅकलेटचा बंगला' ही बालगीतं आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. 

मीनाताईंचं 'मोठी तिची सावली' हे आत्मवृत्त 'दीदी और मै' या नावाने हिंदीमध्ये येणार असुन लतादीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसाचं औचित्य साधुन येत्या रविवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी मुंबईत लतादीदींच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.

Recommended

Loading...
Share