By  
on  

उडान टप्पू सिनेमाच्या गाण्यातून उलगडणार बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर "उडान टप्पू" सिनेमाचं गाणं सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं. मातीच्या गोळ्यापासून टप्प्याटप्प्यानं त्याला येणारा आकार... रंगरंगोटीतून साकारणारं श्री गणेशाचं रूप... साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा आणि आरती... हा श्री गणेशाचा प्रवास मोरया गणाधीशा या गाण्यातून प्रेक्षकांपुढे आला आहे. उडान टप्पू या आगामी सिनेमातलं हे गाणं गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं.

गायत्री व्हिजन आणि जनप्रिया फिल्म्सच्या दत्ता इंद्रजित मस्के "उडान टप्पू" या सिनेमाची निर्मिती करत आहेत. ऋषिकेश शरद जोशी या सिनेमाद्वारे आपला दिग्दर्शकीय प्रवास सुरू करत आहेत. "मोरया गणाधीशा...." हे गीत समृद्धी पांडे यांनी लिहिलं असून, सत्यजित लिमये यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. मिलिंद गुणे यांनी संगीत संयोजन केलं आहे तर ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी हे गीत गायलं आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक ऋषिकेश शरद जोशी म्हणाले, आपल्याकडे मुलांसाठी असे सिनेमे कमी तयार होतत. त्यामुळे मुलांना डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा करत आहे. पूर्वी गणेशाची मूर्ती घरोघरी तयार व्हायची. मात्र, आता तशी होत नाही. त्यामुळे मुलांना मूर्ती कशी तयार होते हेच माहीत नाही. हे लक्षात घेऊन हे गाणं तयार झालं. मुलांना हे गाणं आवडेलच, शिवाय मोठ्यांनाही जुन्या काळात घेऊन जाईल. या गाण्यातून मूर्ती घडण्याचा प्रवास मांडला आहे. तसंच गणेश मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत वडील मुलांतलं नातं, मूर्ती घडवण्यातील मुलांची आत्मीयताही पहायला मिळते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive