पाहा Trailer: भरत जाधव-सुबोध भावेच्या अभिनयाची जुगलंबदी असलेला 'आप्पा आणि बाप्पा'

By  
on  

नुकतंच गणेशोत्सव थाटामाटात सर्वत्र पार पडला. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर हाच विषय घेऊन मोठ्या पडद्यावर एक सिनेमा येत आहे. सिनेमाचं नाव आहे 'आप्पा आणि बाप्पा'. अरविंद जगताप आणि अश्विनी धिर यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. 

'आप्पा आणि बाप्पा'चा ट्रेलर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला असुन या ट्रेलरमधुन एक सामान्य मराठी माणुस गणेशोत्सवामध्ये आर्थिक बाबींमध्ये कसा भरडला जातो, याचं चित्रण पाहायला मिळत आहे. भरत जाधव-सुबोध भावे यांच्या अभिनयाची झक्कास जुगलबंदी ट्रेलरमधुन पाहायला मिळत आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सुद्धा महत्वपुर्ण भुमिकेत पाहायला मिळत आहेत. 

गरिमा प्रोडक्शन प्रस्तुत 'आप्पा आणि बाप्पा' हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरपासुनच 'आप्पा आणि बाप्पा' ची सर्वांना उत्सुकता लागुन राहीली आहे.

Recommended

Loading...
Share