बॉलिवूडच्या या अभिनेत्रीलाही पडला मराठी सिनेमाचा मोह, दिसणार या सिनेमात

By  
on  

मराठी सिनेमाने जागतिक पटलावर स्वत:ची ओळखा निर्माण केली आहे. त्यामुळेच आज विविध भाषांमध्ये काम करणारे कलाकार मराठी सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक असतात. आता बंगाली आणि हिंदी भाषांमधील सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री रायमा सेन ही मराठी सिनेमात दिसणार आहे. रायमाने हिंदी आणि बंगाली भाषेतील सिनेमांमध्ये काम केलं आहे.

‘अन्य’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात रायमाशिवाय अतुल कुलकर्णी, तेजश्री प्रधान, भुषण प्रधान, प्रथमेश परब यांच्याही भूमिका आहेत. सिम्मी जोसेफ हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सिम्मी यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्यानी आजवर दाक्षिणात्य सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. मानवी तस्करीवर हा सिनेमा आधारलेला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share