पाहा Photo: कोठारेंच्या घरी जमलं मराठी तारांगण

By  
on  

 

मराठी सिनेमाचं 80 ते 90चं दशक खुपच खास होतं. कारण या कालावधीत मराठी सिनेमाचे शिलेदार होते लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर. लक्ष्मीकांत बेर्डे वगळता मराठीतील ही चौकडी नुकतीच आदिनाथ कोठारेच्या घरी जमली होती. यावेळचा लाईव्ह व्हिडिओ आदिनाथ कोठारेने शेअर केला आहे.

 

यावेळी अशोक-निवेदिता सराफ, सचिन-सुप्रिया पिळगावकर, आदिनाथ-उर्मिला कोठारे, किरण शांताराम आणि त्यांची पत्नीदेखील उपस्थित होते. यावेळी गोंडस जिजा देखील सुप्रिया पिळगावकर यांच्या मांडीवर दिसली. यावेळी शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना आदिनाथ म्हणतो, ‘नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बाते हैं... ‘

 

या शिवाय उर्मिला कोठारेने देखील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये निवेदिता सराफ आणि सुप्रिया पिळगांवकर या दोघी उर्मिलासोबत बसल्या आहे. ‘2 gorgeous beauties...’ हे कॅप्शन देत उर्मिलाने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रसिक लक्ष्मीकांत बेर्डेला मिस करत असतील यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share