By  
on  

संतोष कोल्हे यांच्या ‘हिजडा’ शॉककथेला 1 कोटीच्यावर व्ह्यूज

व्हायरस मराठी या युट्यूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हिजडा' या शॉककथेला 10M व्ह्यूज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्यावर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. मराठीमध्ये एवढया मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे. मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेनमध्ये भीक मागणारा तृतीयपंथी यांची ही गोष्ट आहे.

https://youtu.be/5ET2L5V5Qng

 

अभिनेत्री छाया कदम यांनी ही तृतीयपंथीयाची भूमिका केली आहे, आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी तृतीयपंथीयाची भूमिका रंगवली होती. पण फॅण्ड्री, सैराट यांसारख्या सिनेमांमधून सतत विविध भूमिकांचं आवाहन स्विकारणाऱ्या छाया कदम यांनी हा हिजडा खूप छान उभा केला आहे. अक्षय शिंपी यानं सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका साकारली आहे. या व्हिडीओची कथा मुकेश माचकर यांची असून  गाण्याचे व्हिडीओ पॉप्युलर होतात पण ही शॉककथा जगभर पहिली गेल्याची पोचपावती या व्हिडिओला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंट्सवरून लक्षात येते. 48k लाईक्स आणि 2.1k कमेंट्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive