आप्पा आणि बाप्पा सिनेमातील नवीन गाणं रिलीज, बाप्पा बोल रे!

By  
on  

गणेशोत्सवाचं सामान्य माणसाला खुप अप्रुप असतं. या उत्सवात काहीही कमतरता राहणार नाही याचीही काळजी तो घेत असतो. पण असं असलं तरी बाप्पाला नक्की काय हवं असतं याचा विचार सर्वच व्यक्ती करतात असं नाही. नेमकं हेच ‘आप्पा आणि बाप्पा’ या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.  'आप्पा आणि बाप्पा'. अरविंद जगताप आणि अश्विनी धिर यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे.  

 

‘बाप्पा बोल रे’ असे या गाण्याचे बोल आहेत. अवधुत गुप्ते आणि सौरभ दफ्तरदार यांनी या गाण्यावर स्वरसाज चढवला आहे. मंदार चोळकर यांनी हे गाणं लिहिलं आहे. गरिमा प्रोडक्शन प्रस्तुत 'आप्पा आणि बाप्पा' हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरपासुनच 'आप्पा आणि बाप्पा' ची सर्वांना उत्सुकता लागुन राहीली आहे.

Recommended

Loading...
Share