पाहा Photos: श्रृती मराठेने केलं ग्लॅमरस फोटोशूट

By  
on  

गोंडस चेहरा आणि निरागस अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या दुहेरी व्यक्तिरेखा साकारणा-या श्रृतीचं सर्वत्र कौतुक झालं.

 

श्रृतीने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. श्रृती सध्या  'बार्ड ऑफ ब्लड' मध्ये झळकत आहे. इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजमध्ये श्रुतीची व्यक्तिरेखा कोणती असेल हे समोर आलं नाही. श्रुती याआधी हिंदीमध्ये 'बुधिया सिंग-बॉर्न टू रन' या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत झळकली होती.

 

Recommended

Loading...
Share