By  
on  

अप्सरा सोनालीची ही मनमोहक अदा पाहून तुम्ही पडाल प्रेमात

अप्सरा आली म्हणत आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिचे विविध लूक्स ती नेहमीच आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर करत असते. चाहत्यांनासुध्दा तिच्या विविध अदा या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर या निमित्ताने पाहायला मिळतात आणि मनमुराद दादसुध्दा देता येते.

सोनालीने नुकताच गणेशोत्सवा निमित्त आपल्या मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेतील एक सुंदर असा फोटो पोस्ट केला आहे. गर्द हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर साजेसा असा लाल रंगाचा सोनेरी नक्षीकाम केलेला ब्लाऊज परिधान केलेल्या सोनालीचं सौंदर्य यात खुलून दिसतंय. तर कानात छान मोठे झुमके आणि महत्त्वाचं म्हणजे नाकातली नथ आणि सोनेरी कमरपट्टा या तिच्या खास लूक्समध्ये चार चॉंद लावतेय.

अप्सरेचा हा मनमोहक लूक नक्कीच पाहणा-यांना प्रेमात पाडणारा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive