By  
on  

पाहा 'बॉईज 2' चा धमाकेदार ट्रेलर

सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल म्हणजे फुल ऑन मस्ती हे समीकरण पक्कं. अवधूत गुप्ते प्रस्तुत सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या 'बॉईज 2' या  आगामी सिनेमाच्या ट्रेलरचे नुकतेच मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. मुंबईत पार पडलेल्या या ट्रेलर लाँच कार्यक्रमात, तरुणांचा लाडका गायक अवधूत गुप्तेंच्या लाईव्ह गाण्याने उपस्थितांची संध्याकाळ शानदार बनली.

'बॉईज 2' या नावामुळेच अधिक प्रसिध्द होत असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने उपस्थितांची मने जिंकली. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटबाजी आणि त्यांच्यातील वादविवाद हेदेखील आपल्याला पाहायला मिळते. शिवाय ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील आपल्याला या ट्रेलरमधून झळकताना दिसतात. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांचीदेखील यात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे समजते.

इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या 'बॉईज 2' सिनेमाचा हा दमदार ट्रेलर रसिकांचे तुफान मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. विशाल देवरुखकर यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने केले आहे. तसेच, या तीन अतरंगी मुलांचा दंगा इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावरदेखील वितरीत केला जाणार असल्या कारणामुळे, 'बॉईज 2' चा हा 'नॉईस'भा रताबाहेरच्या प्रेक्षकांनादेखील अनुभवता येणार आहे.

https://youtu.be/W2b7Dc-bGnI

येत्या 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेला 'बॉईज 2' हा सिक्वेल 'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive