मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अनेक अभिनेते आहेत. त्यापैकी मोजक्या भूमिकांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर.
अभिनयासोबत शरद केळकर एक व्हॉइस आर्टिस्ट, सूत्रसंचालक आणि लेखक सुद्धा आहे. 'बाहुबली 2' मध्ये अमरेंद्र बाहुबलीच्या मुख्य भूमिकेला हिंदी आवाज देऊन शरद केळकरने स्वतःच्या भारदस्त आवाजाची सर्वांना ओळख करून दिली.
'उत्तरायण', 'माधुरी', 'लय भारी', 'राक्षस' सारख्या सिनेमांमधून शरदने मराठी सिनेमांमध्ये स्वतःची छाप पडली.
तसेच 'भूमी', 'रामलीला', 'रॉकी हँडसम', 'इरादा' यांसारख्या बॉलिवूडमधील सिनेमांमधून शरदने मराठीसह बॉलिवूडमध्ये सुद्धा स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं.
नुकतंच शरद 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत झळकला होता.
मध्य प्रदेशला जन्म झालेला शरदने अभिनेत्री कीर्ती रेड्डी सह २००५ साली विवाह केला. आजही शरद केळकरने साकारलेली 'लय भारी' मधील 'संग्राम' हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असणाऱ्या या 'लय भारी' अभिनेत्यास पिपिंगमुनमराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा