By  
on  

पाहा आदर्श शिंदेचं खतरनाक गाणं

आयटम सॉंग म्हटलं कि एखादी सुंदर ललना गाण्यावर ताल धरताना दिसते. पण एखादा अभिनेता क्विचतच गाण्यावर थिरकतो. असंच काहीसं धमाकेदार गाणं घेऊन दिग्दर्शक प्रवीण तरडे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ हा त्यांचा आगामी सिनेमा लवकरच येतोय. प्रसिध्द गायक आदर्श शिंदेच्या दणकेबाज आवाज संगीतबध्द झालेल्या ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या गाण्यावर दिगेदर्शक प्रविण तरडेंनी जबरदस्त ताल धरला आहे.

आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्याच्या वाढदिवसाच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो.

आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी आपल्या अफलातून गायनातून त्याला स्वरसाज चढवला आहे.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत.

https://youtu.be/F4_La1CbFv0

‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना गावातील आणि शहरातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा वास्तववादी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive