दासबोधाची शिकवण देणा-या ‘श्री राम समर्थ’ सिनेमाचा पाहा टीजर

By  
on  

राष्ट्रीय संत रामदास स्वामींनी दिलेला दासबोधाच्या मार्फत दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. लहानपणापासून या ग्रंथाचे संस्कार मुलांवर केले जातात. हे श्लोक रचणा-या समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्राचे पैलू  ''श्री राम समर्थ'' या सिनेमात उलगडणार आहेत. विजयादशमीचा मुहुर्त साधून या सिनेमाचा टीजर रिलीज झालेला आहे.

 

या सिनेमात अलका कुबल आणि शंतनू मोघे मुख्य भूमिकेत आहेत. स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही संकल्पना त्यांनी चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजविली हाेती जी आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे व भरकटलेल्या समाजास त्यांनी सतत वैचारिक मार्गदर्शन केले आहे. कथा- पटकथा - संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केले आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, संगीत महेश नाईक आणि संजय मराठे यांनी दिले आहे. हा सिनेमा 1 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share