By  
on  

Exclusive: दिग्दर्शिका स्वाती भिसेंमुळे तात्या टोपेंच्या भूमिकेमधले बारकावे शोधता आले: अजिंक्य देव

सध्या सगळीकडे ऐतिहासिक सिनेमांचा प्रवाह आहे. यामध्ये स्वाती भिसे दिग्दर्शित 'द वॉरियर क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाचा समावेश होत आहे. स्वाती भिसे दिग्दर्शित या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले यांसारखे मराठी कलाकार या आंतरराष्ट्रीय सिनेमात महत्वपुर्ण भुमिका साकारत आहेत. 

या सिनेमात तात्या टोपेंची महत्वपुर्ण भुमिका अजिंक्य देव साकारत आहे. यानिमित्ताने अजिंक्यने पिपिंगमुन मराठीशी खास बातचीत करत असताना सांगीतले,"तात्या टोपेंचं झाशीच्या राणीच्या आयुष्यात महत्वपुर्ण स्थान होतं. ही भुमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्यच आहे. माझी सुरुवातच ऐतिहासीक भुमिकांमधुन झाली असल्याने जो काही मी थोडाफार इतिहासाचा अभ्यास केला होता तो कामी आला."

दिग्दर्शक स्वाती भिसेंसोबत काम करतानाच्या अनुभवावर अजिंक्य म्हणाला,"माझ्या व्यक्तिरेखेकडुन काय काढुन घ्यायचंय हे स्वाती भिसेंना बरोबर ठाऊक होतं. त्यांच्यामुळेच मला तात्या टोपेंच्या भुमिकेतले बारकावे शोधता आले. स्वाती भिसेंच्या या स्वभावामुळेच मला भुमिकेमध्ये जीव ओतता आला."

'द वाॅरियर क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये जगभरात प्रदर्शित होत आहे. 15 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive