By  
on  

सलमान सोसायटीत 'पार्टी दणाणली'

आज मराठीत नवनवीन व हटके विषयावर सिनेमे येत आहेत आणि त्यांची नावंसुध्दा तशीच असतात. प्रेक्षकांचीसुध्दा या सिनेमांना उत्स्फूर्त दाद मिळते. असाच अतरंगी व हटके नाव असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘सलमान सोसायटी’ असं त्याचं नाव आहे. आज अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहे. कोणी परिस्थितीमुळे तर कोणी अनाथ असल्याने शिक्षण घेऊ शकत नाहीत. ‘'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला ‘सलमान सोसायटी’ सिनेमा बाल शिक्षणासारख्या ज्वलंत विषयावर भाष्य करणारा असणार आहे.

सलमान सोसायटी सिनेमाच्या 'पार्टी दणाणली' या गाण्याचं शुटींग नुकतंच पूर्ण झालं. या गाण्यात सिनेमातील कलाकारांबरोबरच सिनेमाच्या संपूर्ण टीमने धम्माल केली. या सिनेमाचं शूटींग सध्या मुंबईत सुरु आहे. या सिनेमात पुष्कर लोणारकर, गौरव मोरे आणि शुभम मोरे या बालकलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम मोरेने ‘रईस’ या बॉलिवूडपटात बालपणीच्या शाहरुख खानची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याचे खुप कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने ‘हाफ तिकीट’ आणि ‘फास्टर फेणे’सारखे सिनेमे केले आहेत.

कैलाश पवार दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती दशरथ यादव, रेखा जगताप,संपतराव पाटील आणि शांताराव भोंडावे यांनी प्राजक्ता एन्टरटेन्मेन्ट अंतर्गत केली आहे.

लहान मुलांच्या शिक्षणावर बेतलेला सलमान सोसायटी हा सिनेमा यंदाच्या डिसेंबरमध्ये सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive