By  
on  

सलमान खान सांगतोय ‘सिनेमात माझी एक प्रेमळ आई होती,रिमा लागू’

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू आज आपल्यात नाहीत. रिमाताईंच्या जाण्याने सिनेसृष्टीतील पोकळी कधीही भरुन न येण्यासारखी मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रेमळ आईची अप्रतिम भूमिका रिमा लागू यांनी अजरामर केली. शाहरुख खान आणि सलमान खान यांची पडद्यावरची आई म्हणून त्या प्रसिध्द होत्या. रिमाताईंचा होम स्वीट होम हा अखेरचा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूडचा दबंग खान सलमानने एक खास संदेश ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिला आहे.

 

सलमान म्हणतो, “तशा तर घरी मला  दोन आई आहेत. पण सिनेमात माझी एक प्रेमळ आई होती. ती म्हणजे रिमा लागू. माझ्या आईचा होम स्वीट होम हा सिनेमा येत्या 28 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. मी बघणार तुम्ही पण बघा.”

https://twitter.com/hshthefilm/status/1042676416163270656

विशेष म्हणजे सलमान खानने हा खास मेसेज प्रेक्षकांना चक्क मराठीत दिल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले आहे. सेटवर रिमाताई आणि सलमान खुप धम्माल करायचे. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमात मायलेकाची जोडी म्हणून गाजवले आहेत. हम आपके है कोन या सिनेमात रिमाताई त्याच्या भावी सासूच्या भूमिकेत होत्या तर कुछ कुछ होता है, मैने प्यार किया, हम साथ साथ है हे या दोघांचे गाजलेले सिनेमे.

 

ऋषिकेश जोशी एक हरहुन्नरी अभिनेता आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. त्याचा ‘होम स्वीट होम’ हा दिग्दर्शनातील पदार्पणाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘होम स्वीट होम’ या सिनेमात रिमा लागू यांनी एका ज्येष्ठ गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे या कलाकारंच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत.

https://youtu.be/w94LU-wLEiA

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive