पाहा Trailer: जिगरबाज आईच्या जिद्दीची कहाणी: ‘हिरकणी’

By  
on  

 शिवरायांच्या इतिहासात अनेक नावं आहेत जी सुवर्णाक्षरात लिहिली जातील. पण या इतिहासात एक ‘हिरकणी’ अशीही आहे जी स्वत:च्या तेजाने झळकते. याच ‘हिरकणी’ची गोष्ट दिग्दर्शक प्रसाद ओक पडद्यावर घेऊन आले आहेत. रायगडाचे दरवाजे  सूर्यास्तानंतर बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी काळोखात गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणारी हिरकणीची ही शौर्यागाथा आहे.

 

या सिनेमाच्या टीझरनेही रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली होती. आता या सिनेमाचा ट्रेलर आला आहे. ट्रेलर पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. सोनाली कुलकर्णी हिरकणीच्या रुपात शोभली आहे. या ट्रेलरमध्ये शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोण साकारत आहे हे समोर आलेलं नाही. हिरकणीच्या पतीची भूमिका अमित खेडेकर साकारत आहे. यानिमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि अमित यांची ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. कच्चा लिंबूनंतर प्रसादचा हा दुसरा सिनेमा आहे. फाल्गुनी पटेल, लॉरेंस डिसुझा या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share