By  
on  

पाहा Trailer : अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या प्रेम त्रिकोणाची 'ट्रिपल सीट'

प्रेमाची वायरलेस गोष्ट सांगणा-या ‘ट्रिपल सीट’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील  यांच्या प्रेम त्रिकोणाची ही गोष्ट असल्याचं  ट्रेलर पाहून लक्षात येतं. अंकुश आणि शिवानीचं फोनवरचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप स्पष्ट होतं असलं तरी पल्लवी पाटील साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं मात्र कोडं सुटत नाही. त्यामुळे नात्याचा हा गुंता उलगडण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट आपल्याला पाहावी लागेल. 

अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संकेत पावसे यांनी सांभाळली आहे. 

 

‘ट्रिपल सीट’मध्ये अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या सिनेमाचे सहनिर्माते स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माते अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रिपल सीट’ हा सिनेमा आता २४ ऐवजी २५ ऑक्टोबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

 

पाहा ट्रेलर -

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive