माधुरी दीक्षित-श्रीराम नेने यांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण,आफ्रिकेतील सेशल्स आयलॅंडवर सुरुय रोमॅण्टीक हॉलिडे

By  
on  

आपल्या नखशिखान्त सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने आजही तितकीच चिरतरुण आहे. माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. एक मेड फॉर इच अदर असलेलं क्युट कपल म्हणून नेहमीच ते चर्चेत असतात.  

सतत आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात असणारे हे बॉलिवूड कपल सध्या रोमॅण्टीक हॉलिडे एन्जॉय करत आहेत. आफ्रिकेतील सेशल्स आयलॅंडवर ते स्पेशल हॉलिडेवर आहेत, याचं कारणसुध्दा खास आहे. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाचा 20 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हे जोडपं आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून या जगातील सर्वात महागडया समजल्या जाणा-या आयलॅंडवर हॉलिडे एन्जॉय करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy anniversary @drneneofficial Here's to many more years of being in love & celebrating life!

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

माधुरीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत निळ्याशार समुद्राच्या साथीने जबरदस्त चिलींग मूडमध्ये दिसतेय. दोघांचेही हे फोटो पाहून कोणाचीसुध्दा यांना दृष्ट लागू नये असंच वाटतंय. त्यांचे हे रोमॅण्टीक फोटोस पाहून चाहत्यांचा त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

 

माधुरी ही डॉ. श्रीराम नेने यांच्या सोबत 17 ऑक्टोबर 1999 रोजी विवाहबंधनात अडकली होती. त्यानंतर ती अमेरिकेतच स्थायिक झाली. दहा वर्षांच्या सुखी संसार केल्यानंतर आणि दोन मुलांच्या जन्मानंतर माधुरी पुन्हा संपूर्ण कुटुंबियांसह भारतात परतली. 2007 साली तिने आजा नच ले सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. आतासुध्दा ती डान्स रिएलिटी शोची मुख्य परिक्षक म्हणून छोटा पडदा गाजवतेय.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

High tides & good vibes!

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

.'पंचक' हा नवा मराठी सिनेमा घेऊन माधुरी निर्माती म्हणून 15 ऑगस्ट या मराठी सिनेमानंतर पुन्हा लवकरच रसिकांसमोर निर्माती म्हणून  येतेय. या सिनेमाचा नुकताच मुहूर्त सेंपन्न झाला. माधुरी आणि तिचे पती डॉ.श्री राम नेने यांनी मुहूर्त क्लॅप देत ह्या सिनेमाची अधिकृत घोषणा सोशल मिडीयावरुन केली आहे.  माधुरी दीक्षित निर्मित  'पंचक' सिनेमाच्या कथेविषयी आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Elated to announce our film banner, @rnmmovingpictures, next project, #Panchak It's a fantastic and hilarious take on belief & superstitions for the whole family. Sending my best wishes to our team as they start shooting today! निर्माती म्हणून अजून एक रोमांचक चित्रपट "पंचक" तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, पांचकच्या संपूर्ण टीमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा| . . @drneneofficial #JayantJathar @adinathkothare @tejashripradhan @ingale_anand @mi_nandita #BharatiAcharekar @bappajoshi27 #SatishAlekar @sagartalashikar #DiptiDevi #AshishKulkarni #NitinVidya #UmeshAjgaonkar

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

 

Recommended

Loading...
Share