By  
on  

यापूर्वी तुम्ही कधीही ऐकली नसेल 'आईची आरती', पाहा Video आशा भोसलेंच्या स्वरसाजात

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका, सुंदर गाणी आणि हटके ट्रेलर आणि प्रोमोमुळे या सिनेमाची समस्त मराठीजनांना उत्सुकता आहे. या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असताना सिनेमाच्या टीमने 'हिरकणी'मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. 'आईची आरती' असं या गाण्याचं नाव असून दिग्गज गायिका आशा भोसले यांनी या गाण्याला स्वतःच्या सुरांनी सजवलं आहे. 

या नव्या गाण्याचा व्हिडिओ नुकतंच यू ट्यूब वर प्रदर्शित झाला. यामध्ये आशा भोसले यांच्या गायनाने रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मंत्रमुग्ध झालेली संगीतकारांची टीम दिसते. तसेच स्टुडिओमध्ये सिनेमाचे निर्माते राजेश मापुस्कर, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित असलेली पाहायला मिळते. आशा भोसले हे गाणं गात असताना एका क्षणाला आशा भोसलेंसह सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहायला मिळत आहे. लोकप्रिय कवी संदीप खरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

 

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ सिनेमात सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. फाल्गुनी पटेल या निर्मात्या आणि लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आहेत. राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. २४ ऑक्टोबरला दिवाळीची मनोरंजक भेट म्हणून ‘हिरकणी’ येतेय तुम्हा सर्वांना भेटायला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात...

Recommended

PeepingMoon Exclusive