By  
on  

अभिनेत्रीला नेहा महाजनला झालाय अवर्णनीय आनंद, कारण माहितीय का?

मराठी अभिनेत्रींमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये अव्वल असणारी अभिनेत्री म्हणजे नेहा महाजन. आपल्या फोटोंमुळे आणि सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे नेहा महाजन नेहमी प्रकाशझोतात असते. परंतु नेहा महाजनच्या अंगी असलेलं एक छुपं कौशल्या नुकत्याच एका व्हिडिओमधून समोर आले आहे. 

नेहा महाजनने स्वतःच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा तिच्या बाबांसोबत सितार वाजवताना पाहायला मिळत आहे. 'बाबांसोबत सितार वाजवणं म्हणजे वाहत्या नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासारखं आहे', अशा शब्दांमध्ये नेहा महाजनने आपला आनंद व्यक्त केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Playing with Baba is like swimming in the river with floats on! #sitar #concert @vidur.mahajan

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

एका सांगीतिक समारंभात नेहा महाजन आपल्या बाबांसोबत सितार वाजवत आहे. आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला सितार वाजवताना पाहून नेहा महाजनच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का निश्चितच बसला असेल यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive