By  
on  

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय,‘ओक ठोक by प्रसाद ओक’

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. अभिनयात आपली जादू दाखविल्यानंतर त्याने 'कच्चा लिंबू' सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं, त्याच्या या नव्या भूमिकेचं बरंच कौतुक झालं. अनेक मानाच्या पुरस्कांरावर 'कच्चा लिंबू' सिनेमाने आपली मोहोर उमटवली. आपल्या निखळ विनोदांनी आणि हस-या व्यक्तिमत्त्वाने नेहमीच प्रेक्षकांचा लाडका ठरलेला अभिनेता प्रसाद ओक लवकरच त्यांच्यासाठी मनोरंजनाची एक नवीन मेजवानी घेऊन येतोय.

सोशल मिडीयाद्वारे चाहत्यांशी संवांद साधत नेहमीच सक्रिय असणारा प्रसाद ओक, आपल्या आगामी प्रोजेक्टसची माहिती इथेच देतो. प्रसादने नुकतंच एक नवीन पोस्टर शेअर करत आपण एक स्टॅण्ड-अप कॉमेडी कार्यक्रम घेऊन येत असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणतोय, “एक नवाकोरा करकरीत *एकपात्री"* कार्यक्रम... "ओक ठोक" हसत खेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणारा...*stand-up* with *standard*...!!! आता रोख ठोक नाही,"ओक ठोक" बोलायचं...!!! शुभारंभाचा प्रयोग 27 सप्टेंबर...महाराष्ट्र मंडळ "अबू धाबी"

प्रसाद ओकच्या या पोस्टवरुनच त्याचा हा एकपात्री कॉमेडी कार्यंक्रम येत असून दुबईत येत्या 27 सप्टेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे. स्टॅण्ड-अप कॉमेडीचं लेखन समीर चौगुले यांनी केलं आहे महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या पोस्टरवरुन या कार्यक्रमात प्रसादची पत्नी मंजिरी ओक यांच्यासोबतच सई ताम्हणकर, सिध्दार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, जितेंद्र जोशी, प्राजक्ता माळी, अंकुश चौधरी,संदीप पाठक, सिध्दार्थ जाधव आणि संतोष जुवेकर हे कलाकार विशेष सहभागी होणार आहेत.

https://www.instagram.com/p/BoLb67vlivP/?taken-by=oakprasad

सर्वांनाच आता प्रसादच्या ‘ओक ठोक by प्रसाद ओक’ या स्टॅण्ड-अप कॉमेडी कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे. पिपींगमून मराठीतर्फे प्रसाद ओकला या नव्या कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा !

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive