By  
on  

Photos: 'हिरकणी'चा जीवा साकारणाऱ्या अमित खेडेकरची पत्नी सुद्धा आहे ही सुंदर अभिनेत्री

सध्या महाराष्ट्रामध्ये 'हिरकणी' या सिनेमाला 'हाऊसफुल' प्रतिसाद मिळत आहे. सोनाली कुलकर्णीने साकारलेल्या हिरकणीचं सर्वच स्तरांवर कौतुक आहेत. 'हिरकणी' शिवाय या सिनेमामधील आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली ती म्हणजे 'जिवा'. 'जिवा'ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता अमित खेडेकर याने. अमित खेडेकरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अमित खेडेकरची बायको सुद्धा मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. 

 

रश्मी अनपट हे अमितच्या बायकोचं नाव असून झी युवा वरील 'फ्रेशर्स' या मालिकेतून रश्मी अनपट हे नाव घराघरात पोहोचलं. रश्मीने 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'पुढचं पाऊल' यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. 

रश्मी अनपटने २०१४ साली अमित खेडेकरशी विवाह केला. या दोघांना एक वर्षांचा अभीर नावाचा एक छोटा मुलगा सुद्धा आहे. 

रश्मी ही मूळची पुण्याची असून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पुण्याहून मुंबईत आली. 

लहानपणापासून रश्मीने शाळेमधील नाटकांमध्ये आणि पुढे कॉलेजमधील एकांकिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 

रश्मी आता कोणत्या नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. पण सध्या नवरा अमित खेडेकरची भूमिका असलेल्या  'हिरकणी' सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे रश्मी निश्चितच खुश असेल यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive