By  
on  

Birthday Special: स्वतःच्या दर्जेदार अभिनयाद्वारे प्रत्येक भुमिका समरसुन जगणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणा-या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.

 

 

सोनाली कुलकर्णी नाव उच्चारताच 'दिल चाहता है' मधीव 'वो लडकी है कहा?' हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. या सिनेमामधील सोनालीचा डान्स आणि अभिनय तिच्या चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. सोनालीने हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची दखल घेण्यायोग्य काम केलंच पण मराठी, गुजराती, तामिळ सिनेमांमध्ये आणि रंगभुमीवर सुद्धा स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

 

 

सोनाली कुलकर्णी आणि नाना पाटेकर यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. देऊळ, डाॅ. प्रकाश बाबा आमटे, टॅक्सी नं. 9211 यांसारख्या सिनेमांमध्ये या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या लक्षात राहीली. 

दिल चाहता है, सिंघम, भारत, टॅक्सी नं. 9211, पोस्टर बाॅईस यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये तिने महत्वपुर्ण भुमिका साकारल्या. तर सखी, गुलमोहर, देऊळ, रिंगा रिंगा, पुणे 52, अगं बाई अरेच्चा 2, गुलाबजाम या मराठी सिनेमांमध्ये तिने साकारलेल्या भुमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहील्या. 

 

 

मराठी असो वा हिंदी प्रत्येक सिनेमामध्ये स्वतःच्या सुंदर अभिनयाचा प्रत्यय प्रेक्षकांना करवुन देणा-या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला पिपिंगमून मराठीतर्फे वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive