मराठी सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव ध्रुवता-या इतकंच अढळ आहे. याच ता-याचा वारसा पुढे नेण्यासाठी अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे सज्ज झाला आहे. 2016 मध्ये अभिनयने ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून मराठी सिनेमात पदार्पण केलं. या सिनेमातील त्याचा वावर वावर प्रेक्षकांना भलताच आवडला. अभिनयच्या रुपाने मराठी सिनेमाला नवा चॉकलेट बॉय मिळाल्याचं बोललं जाऊ लागलं.
अभिनय आणि आर्या आंबेकरच्या जोडीलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. त्यानंतर त्याचा ‘अशी ही आशिकी’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला. हेमल इंगळसोबत त्याच्या या केमिस्ट्रीला रसिकांनी पहिल्या सिनेमा इतका प्रतिसाद दिला नाही. याच वर्षी अभिनयचा ‘रंपाट’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला.
हा सिनेमा इतका प्रभाव पाडू शकला नसला तरी त्याच्या अभिनय कौशल्याचं कौतुक झालं. अभिनय बेर्डेच्या करीअरची सुरुवात असली तरी वडिलांप्रमाणे तो ही या क्षेत्रात पाय रोवून उभा राहिल यात शंका नाही. पीपिंगमून मराठी तर्फे अभिनय बेर्डेला वाढदिवसाच्या शुभेच्छा...