कलाकार हा स्वतःच्या दिसण्याबाबत जागरुक असतोच शिवाय त्याला स्वतःच्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं. शुटींगच्या व्यस्त शेड्युलमधुन वेळ काढत फिटनेसबाबतीत जागरुक असणा-या कलाकारांमध्ये अभिनेता मिलिंद सोमणकडे पाहीले जाते. आज मिलिंद सोमणचा वाढदिवस आहे. पिपिंगमून मराठीतर्फे मिलिंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मिलिंदने माॅडेल म्हणुन स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात केली आहे. त्यानंतर 'कॅप्टन व्योम', 'मार्गारीटा' आणि 'अ माऊथफुल ऑफ स्काय' यांसारख्या हिंदी आणि इंग्रजी टेलिव्हिजन सिरीयलमध्ये काम केले आहे.
2000 साली नाना पाटेकरांची प्रमुख भुमिका असलेल्या 'तरकीब' या हिंदी सिनेमातुन मिलींदने सिनेसृष्टीत प्रवेश केला.
त्यानंतर पुढे हिंदी तसेच मराठी सिनेमांमध्ये मिलिंदने स्वतःच्या अभिनयाची चुणुक दाखवली. भारतीय सिनेसृष्टीसोबतच काही परदेशी भाषिक सिनेमांमध्ये सुद्धा मिलिंदने काम केले.
20 मे 2012 मध्ये ग्रीनेथाॅन साठी 30 दिवसांमध्ये 1500 किमी. धावल्यामुळे मिलिंद सोमणची लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डस मध्ये नोंद झाली.
छातीच्या कॅन्सरबाबत आणि निरोगी आयुष्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणुन 2012 साली 'पिंकेथाॅन' या उपक्रमाचा मिलिंद सोमण ब्रँड अँबेसिडर झाला.
आपल्या वयाच्या 26 वर्ष लहान अंकीता कोनवारशी लग्न केल्याने मिलिंद चर्चेत होता. मिलिंद आणि अंकीताचे लव्हेबल फोटोस सोशल मिडीयावर चांगलेच प्रसिद्ध आहेत.
अभिनय, माॅडेलिंग, सायकलिंग, स्विमिंग अशा सर्वच बाबतीत कार्यरत राहुन युवा पिढीचे प्रेरणास्थान असणा-या मिलिंद सोमणला पिपिंगमून मराठीर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा