मुंबईतलं एकेकाळचं गुंडा राज आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जरी आपण याचे साक्षीदार नसलो तरी आपल्या आई-वडिलांकडून किंवा वडिलधा-या मंडळीकडून 80-90च्या काळातील गुन्हेगारीच्या नाट्यमय थरारक गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील. दाऊद इब्राहीम, हाजी मस्तान यांच्यासारख्या अट्टल गुंडाच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमे अथवा पुस्तकं आजवर प्रदर्शित झाली आहेत. पण प्रथमच छोटा राजनच्या गुन्हेगारी विश्वाची सफर घडवणारा ‘राजन’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमाचा ट्रेलरसुध्दा नुकताच प्रदर्शित झाला असून आता या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्त्वाचं म्हणजे अभिनेता राकेश बापट आपल्या चॉकलेट बॉयच्या भूमिकांना तडा देत प्रथमच अॅंग्री यंग मॅन गुंड ‘राजन’ची प्रमुख व्यक्तिरेखा या सिनेमात साकारत आहे. कुख्यात गुंड राजनच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन भरत सुनंदा यांनी केले आहे. या ट्रेलरमध्ये 80 -90 च्या दशकांतील अंडरवर्ल्डची गटबाजी आणि थरार पाहायला मिळतोय. राकेश बापटचा हा कुख्यात डॉनच्या अवतारातील जबरदस्त लूक दिसून येतोय. सिनेमात त्याला या हटके भूमिकेत पाहण्यासाठी प्रचंड आतुरता आहे.
https://youtu.be/OyqCGwhEIXs
राहुल गौतम सतदिवे, दर्शना सागर भांडगे, दिप्ती श्रीपत यांची निर्मिती आणि कल्याण शिवाजी कदम, धनुष खंडारे, हेमंत वामनशेठ पाटील यांची सहनिर्मिती या सिनेमाला लाभला आहे. ‘राजन’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या 19 ऑक्टोबर 2018 रोजी संपूर्ण प्रदर्शित होत आहे.