पाहा Photos:प्रसिध्द क्रिकेटरची पत्नी आहे ही मराठमोळी सुंदर अभिनेत्री

By  
on  

सागरिका घाटगे हे नाव इंडस्ट्रीत नवं नाही. 'चक दे' सिनेमामधून बॉलिवुडमध्ये दमदार पदार्पण करणा-या सागरिकाने 'रश', 'फॉक्स', 'इरादा', 'दिलदरिया' यांसारख्या हिंदी सिनेमांतुन स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. पण बॉलिवुडमध्येच न थांबता तिने आपली मायबोली म्हणजेच मराठी सिनेसृष्टीतसुध्दा पाऊल ठेवलं.  नुकतंच सागरिका बॉस या हिंदी वेबसिरीजमधून रसिकांच्या भेटीला आली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@sashajairam

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

 

 

 

सागरिकाने 'प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. चतुरस्त्र अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्यासोबत सागरिका नायिका म्हणून झळकली. मूळची कोल्हापूरची असलेल्या सागरिकाने प्रसिध्द क्रिकेटर झहीर खानसोबत 2017 साली लग्नगाठ बांधली. हा प्रेमविवाह असल्याने सुरुवातीला झहीरच्या घरुन विरोध होता, पण नंतर  तो मावळला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

 

'चक दे इंडिया' या पहिल्याच सिनेमातून हॉकी प्लेअरची दमदार भूमिका साकारल्यानंतर सागरिका आपल्या आगामी मराठा सिनेमातून फुटबॉल प्लेअरची भूमिका साकारणार आहे. 'मान्सून फुटबॉल' असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हिरवी साडी नेसलेली, कपाळावर टिकली असलेली आणि फुटबॉलसह उभी असलेली एक हटके पोझ सागरिकाने दिली आहे.  तिच्या या आगामी मराठी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागुन राहिली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ @weddingnama

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Look what I found @imanojj

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

Recommended

Loading...
Share